Failure of the Intelligence machinery detrimental to nation’s security – Anil Dhir

c72dcd6e-9f84-4e49-abd7-82ef63a49795

ENGLISH

II Jayatu Jayatu Hindurashtram II

Date : 22.6.2016

To,

The Editor / Chief Reporter,

Press Release

Fourth Day of the 5th All India Hindu Adhiveshan

Failure of the Intelligence machinery detrimental to nation’s security – Shri. Anil Dhir, National Secretary, Bharat Raksha Manch

Ramnathi (Goa) : Today, our important websites are vulnerable to hacking. The intelligence machinery is filled with incompetent people. There is lack of coordination on intelligence inputs. The government uses the officers for its own selfish means. This raises questions on the competence further, on the existence of the intelligence machinery! The country’s security is in the hands of the intelligence. Shri. Anil Dhir, National Secretary of Bharat Raksha Manch said that it is now necessary that every patriot become a self motivated part of the intelligence machinery. He was speaking on the ‘Failure of the Intelligence machinery’ session on the 4th day of the 5th All India Hindu Adhiveshan.

Ethnic cleansing of Hindus in Sri Lanka ! – Shri. Sachithananthan

Hindus have been an integral part of Sri Lanka. The British left Sri Lanka as a Hindu state, but with the increase in Muslim, Christian and Buddhist populations, the police has become oppressive to Hindus. Shri. Maravanpulavu Sachithananthan of Sri Lanka earnestly appealed to the Hindu leaders of India, Nepal and Bangladesh to visit and provide assistance to the Hindus there. He said that innocent Hindus are being murdered in a systematic effort to ethnically cleanse the region of Hindus.

Shri. Suryakant Kelkar, Coordinator of Bharat Raksha Manch expressed concern about infiltration by Bangladeshi Muslims. He said ‘the Modi government signed the Indo-Bangladesh Border Pact which only reallocated the statuses of villages on either side. There was no mention about the plight of Bangladeshi Hindus or illegal infiltration by Bangladeshis. The Government should enact stringent steps to stop this infiltration’.

Yours,

Shri. Ramesh Shinde, National Spokesperson,

Hindu Janajagruti Samiti,

Contact : 09987966666 

——————————————-

Photo Caption of the 4th day of Pancham All India Hindu Adhiveshan :

ABHA_D21_Ph_M2 : From Left Shri. G. Radhakrishnan (Shivsena Tamilnadu State President), Shri. Suryakant Kelkar, Shri. Kartik Salunkhe (Hindu Janajagruti Samiti) and Shri Anil Dhir (while addressing the convention) 

===============================================

MARATHI

॥ जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ॥

दि. 22.6.2016

प्रती,

मा. संपादक / मुख्य वार्ताहर,

कृपया प्रसिद्धीसाठी

गोवा येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा चौथा दिवस

गुप्तचर विभागाचे अपयश देशाच्या संरक्षणासाठी

घातक ! अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

रामनाथी (गोवा) – आज आपली महत्त्वपूर्ण माहिती असलेली संकेतस्थळे कोणीही हॅक करू शकते. बुद्धीवंतांपेक्षाही बर्‍याच वेळेला अकार्यक्षम पोलिसांची गुप्तचर खात्यामध्ये भरती केली जाते. गुप्त माहितीच्या संदर्भात गुप्तचर यंत्रणांमध्येही समन्वय नसतो. शासनही गुप्तचर विभागांमधील अधिकार्‍यांचा स्वतःच्या लाभासाठी चुकीच्या पद्धतीने वापर करून घेते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा कार्यक्षम आहेत का ?, यापेक्षाही गुप्तचर यंत्रणा अस्तित्वात आहेत का ?, असा प्रश्‍न निर्माण होतो. गुप्तचर विभागावर देशाचे संरक्षण अवलंबून आहे. त्या अपयशी ठरल्यास त्याचा परिणाम थेट देशाच्या संरक्षणावर होतो. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी स्वतःच दक्ष गुप्तचर म्हणून कार्य करायला हवे, असे प्रतिपादन ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांनी केले. पाचव्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीच्या राष्ट्रीय सुरक्षेत गुप्तचर यंत्रणांचे अपयश या विषयावर ते बोलत होते.

श्रीलंकेत हिंदूंचा पद्धतशीर वंशविच्छेद !श्री. सच्चिदानंदन्

लक्षावधी वर्षांपासून श्रीलंकेत हिंदूंचे वास्तव्य आहे. ब्रिटीश जेव्हा सोडून गेले, तेव्हा ती हिंदु भूमी म्हणून आम्हाला मिळाली;पण आज श्रीलंकेत मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध यांची लोकसंख्या वाढली असून पोलिसांकडून तेथील हिंदूंचे दमन केले जात आहे. निरपराध हिंदूंना गोळ्या झाडून ठार केले जात आहे. श्रीलंकेत हिंदूंचा पद्धतशीर वंशविच्छेद चालू असून तेथील हिंदूंच्या साहाय्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी भारत, बांगलादेश, नेपाळ येथील हिंदुत्वनिष्ठांनी श्रीलंकेत यावे, असे कळकळीचे आवाहन श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी केले.

बांगलादेशी मुसलमान घुसखोरांच्या समस्येविषयी भारत रक्षा मंचचे संयोजक श्री. सूर्यकांत केळकर म्हणाले, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार सीमा निश्‍चिती करून गावांची अदलाबदल करण्यात आली; मात्र त्या करारामध्ये बांगलादेशातील पीडित हिंदूंचे संरक्षण, तसेच बांगलादेशातून होणारी अवैध घुसखोरी रोखणे यांच्यासंदर्भात काहीच ठरवले गेले नाही. कोट्यवधींच्या संख्येने होणारी बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी शासनाने कठोर कायदा करावा.

                                        आपला विनीत,

                          श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,

                                   संपर्क क्रमांक : 09987966666

————————————- 

पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीच्या सत्राच्या छायाचित्रांचे कॅप्शन

ABHA_D21_Ph_M2 : डावीकडून श्री. जी. राधाकृष्णन् (शिवसेना तमिळनाडू राज्य अध्यक्ष), श्री. सूर्यकांत केळकर, श्री. कार्तिक साळुंखे (हिंदु जनजागृती समिती) आणि बोलतांना श्री. अनिल धीर

Source: World Hindu News (WHN)